Ad will apear here
Next
सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती
भटकायला बहुतेकांना आवडत असते. त्यात मुलांना सुटी लागली की चार दिवस कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाते. पण हे भटकणे निरर्थक, केवळ मौजमजा असे न राहता निसर्गाचा अनुभव घेत, माणसांशी संवाद साधत, आजूबाजूच्या परिसरातील माहिती घेत केलेला प्रवास आनंददायी तर होतोच, शिवाय अशी भटकंती सार्थकी लागते.

अशा भटकणे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत कसे करता येते हे ओंकार वर्तले यांनी 'सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती'मध्ये सांगितले आहे. सह्याद्रीत अनेक गड - किल्ले, लेण्या आहेत. यातील काही परीचित तर काही अपरिचित आहेत. आडवाटेवरील अप्रकाशित अशा अनवट ठिकाणांची माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे.

पद्मावती, गडद, काम्ब्रे, घोराडेश्वर, पाटेश्वर आणि लेण्यांचे वैभव लेखकाने शब्दातून समोर ठेवले आहे. खानदेशातील लळिंग, सोनगीर, झोडगे गौताळा, रामघळ तसेच नगर जिल्ह्यातील कलाडगड, रत्नागिरी संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर, नगर व नाशिकच्या सीमेवर उभे असलेले अलंग - मदन - कुलंग हे दुर्गत्रिकुट, सिंधुदुर्गातील विजयदुर्ग आदी ४५ ठिकाणांची ओळख , त्यांचा इतिहास, तेथील भटकंती, तेथे जाण्याचा मार्ग सांगितला आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZNFBD
Similar Posts
एडिसन थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकले की बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, चित्रपट अशा अनेक गोष्टी आठवतात, ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. एक हजार ९३ पेटंट त्यांनी मिळवली होती, अशी माहिती देऊन थोर वैज्ञानिक व अमेरिकेचे लोकनायक ठरलेल्या एडिसन यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न 'एडिसन अदृश्य नियमांचा ज्ञाता'मधून केला आहे
ज्ञानसुधा आपण जीवनात अनेक गोष्टी करीत असतो. वाचन, मनन करीत असतो पण ते का करावे, व त्या मागील हेतू, त्याचे महत्व बहुतेक वेळा माहीत नसते. अगदी रोज प्रार्थना का करावी खरे संन्यासी जीवन कसे असते. चांगले मन, वर्णमाला, अध्यात्म क्षेत्रातील तीनाचे महत्व, लग्नविधी, तत्पपदी, आलिंगनाचे महत्व, हनुमान, बालाजी यांचे महात्म्य,
सूरबाला आयुष्यात अनेकांशी परिचय होत असतो. काही जणांशी चांगली मैत्री होते. तर काहींचा थोड्या काळासाठी सहवास घडतो. अशा संबंधावर आधारित 'सुरबाला' हा कथासंग्रह सुभाष मुरलीधार कर्णिक यांनी लिहिला आहे. यातील 'शाली' ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. बिनधास्त, फटकळ शालीची खूप वर्षांनी भेट झाल्यावर तिचे मनोहारी भावविश्व,
समय नियोजनाचे नियम जे कार्य आज करता येण्याजोगे आहे, ते उद्यावर ढकलू नाक, असे बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटले होते. वेळेचे हेच महत्व या पुस्तकातून पटवून देण्यात आल आहे. वेळेचा उपयोग कसा करायचा हे सांगून वेळ कुठे व्यर्थ जातो, याचा शोध घेण्याचा सल्ला या पुस्तकात दिला आहे. कामावर लक्ष केंद्रित कसे करायचे, कार्याची योग्य निवड

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language